{"title":"D. V. Jahagiradar","description":"","products":[{"product_id":"stephen-hawking-by-d-v-jahagiradarस्टीफन-हॉकिंग","title":"Stephen Hawking By D. V. Jahagiradar(स्टीफन हॉकिंग)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभौतिकशास्त्र विषयातील आपल्या प्रचंड व्यासंगाने दबदबा निर्माण केलेले. प्रा. स्टीफन हॉकिंग. कायमचं शारीरिक अपंगत्व असूनही केवळ अचाट बुद्धिमत्ता व अद्वितीय मनोबलाच्या जोरावर संशोधन करणारे अफलातून शास्त्रज्ञ. ही व्यक्ती अपंग आहे. व्हीलचेअरवर बसून असते. साधे शारीरिक धर्मही जिला स्वत: करता येत नाही, त्या व्यक्तीला परमेश्वराने मात्र दिली आहे अचाट बुद्धिमत्ता व अलौंकिक जिद्द. त्यांची जगण्याची जिद्द ही त्यांच्या जीवनाची एक अलौकिक बाजू.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहॉकिंग यांना समाजिक मान्यता, अमाप लोकप्रियता संपूर्ण जगात मिळाली ती 1990-2000 च्या दशकात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्टिफन हॉकिंग यांनी विज्ञानाधारित भरपूर लेखन केलंय. ‘कृष्णविवर’ आणि ‘क्वांटम ग्रॅव्हिटी’ यावरही यांनी काम केलयं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात त्यांचे शास्त्रीय संगोपन तर सांगितले आहेत; पण त्यांची शास्त्रीय व्याख्याने, त्यांच्या मुलाखती व इतरांना व्यक्ती म्हणून ते कसे वाटतात याचाही ऊहापोह केला आहे. इ.स. 2000 नंतर परग्रहावरील वस्ती व आपले भविष्यकाळातील जीवन यावर त्यांनी दिलेली भाषणे संक्षेपाने दिली आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्टीफन हॉकिंग यांच्या एकूणच आयुष्यातून आनंद, जिद्द व जीवनावर प्रेम करण्याचा संदेश मिळतो. विद्यार्थी, तरुण आणि विज्ञानप्रेमी प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या या चरित्रात्मक पुस्तकातून आनंद मिळेल यात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ D. V. Jahagiradar","offer_id":46117393432834,"sku":"","price":111.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinalDesignE-Book-5.jpg?v=1746082601"},{"product_id":"issac-newton-te-ligo-by-d-v-jahagiradar-आयझॅक-न्यूटन-ते-लायगो","title":"Issac Newton te Ligo By D. V. Jahagiradar (आयझॅक न्यूटन ते लायगो)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगुरुत्वाकर्षण- विश्वातील सर्व वस्तुमानाला बांधून ठेवणारी शक्ती, असह्य बल. शास्त्रज्ञांना या बलाचं अस्तित्व समजलं होतं; पण प्रयोगाने ते दाखविता येत नव्हतं. आता, म्हणजे २०१६ साली प्रयोगाने ते सिद्ध करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे. आपणाला गुरुत्वाकर्षण लहरी सापडल्या आहेत, दिसल्या आहेत. शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांचा हा लोभस परिपाक आहे. प्रयोग मानवी बुद्धिमत्ता, कष्ट, अचूकता या सर्वांचा संगम आहे. याची मनोवेधक कहाणी समजण्यासाठी शास्त्रीय जगतात, यासाठी भूतकाळात करण्यात आलेल्या प्रयत्नांची जाणीव असणे आवश्यक आहे. प्रस्तुत पुस्तकात ही माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. एका महान क्षेत्रात शास्त्रज्ञांनी केलेला हा उत्तुंग प्रवास आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआर्यभट, केप्लर, न्यूटन, गॅलिलिओ, आइन्स्टाइन, हॉकिंग या महान गणितज्ञ, शास्त्रज्ञांनी केलेल्या अथक प्रयत्नांना आलेलं हे मधुर फळ आहे. हा सर्व इतिहास सुबोध, सुस्पष्ट तितकाच मनोरंजक करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. शास्त्रज्ञांची शास्त्रीय जाणीव, त्याबरोबरच त्यांचं मानवी रूप दाखविण्याचा प्रयत्न, एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा वाचकांवर उमटावा म्हणून प्रकर्षाने केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहा प्रवास वाचकांना आवडो व पुस्तक पूर्ण वाचल्यानंतर मनात एकूणच शास्त्रीय जगताबद्दल, म्हणजेच पर्यायाने वैज्ञानिक दृष्टीबद्दल आदर निर्माण झाला, तर पुस्तक लिहिण्याच्या प्रवासाचे उत्तम फलित लेखकाला मिळेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ D. V. Jahagiradar","offer_id":46122711679234,"sku":"","price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/810jPPg1aEL._SY466.jpg?v=1746168961"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/d-v-jahagiradar.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}