{"title":"Bramhanand Deshpande","description":"","products":[{"product_id":"vishwatil-mahan-bhashane-by-bramhanand-deshpande-विश्वातील-महान-भाषणे","title":"Vishwatil Mahan Bhashane By Bramhanand Deshpande  (विश्वातील महान भाषणे)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eव्यक्तीची वाणी आणि कर्तृत्व यामुळे त्या व्यक्ती चिरकाल आपल्या स्मृतीत राहतात. आपल्या भाषणांनी जनसामान्यांना प्रेरित करण्याची क्षमता सर्वच वक्त्यांमध्ये असतेच असे नाही. ज्या महान विभूतींमध्ये ही क्षमता होती, त्यांच्या भाषणांचे संकलन म्हणजेच ‘विश्वातील महान भाषणे’ हे पुस्तक.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकाद्वारे आजच्या सुज्ञ वाचकांना हे सत्य जाणवेल की, इतिहासात कधी मोठ्यातला मोठा त्याग करून सत्य प्रकट करणारे निष्णात, साहसी व्यक्तिमत्त्व होते; तसेच थकल्याभागल्या लोकांच्या हृदयात विद्रोहाचे निखारे भडकविणारेही होते. आपल्या थोड्याशा शब्दांनी राष्ट्राच्या कठीण प्रसंगी प्राणांची बाजी लावण्याची प्रेरणा देणारेही होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअब्राहम लिंकन, अल्बर्ट आइनस्टाइन, गॅलिलिओ गॅलिली, जॉन एफ. केनेडी, नेल्सन मंडेला, बराक ओबामा, मार्टिन ल्यूथर किंग ज्यूनिअर यासारख्या पाश्चात्त्य; तसेच महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, बाळ गंगाधर टिळक, सुभाषचंद्र बोस, ए.पी.जे. अब्दुल कलाम यासारख्या भारतीय विभूतींच्या विचारांमध्ये एक साम्य होते. ते म्हणजे विविध राष्ट्र, समाजातील सर्व भागांची चिंता आणि अशा राष्ट्रांच्या, समाजाच्या प्रगतीसाठी त्यांच्यातील तळमळ, काळाच्या पडद्याआड गेलेल्या यातील काही व्यक्ती त्यांच्या प्रेरक विचारांमुळे आजही जिवंतच आहेत, हेदेखील एक निर्विवाद सत्यच. या सर्वांनीच दिलेला हा शांतीचा संदेश आपल्यासाठी सादर.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Bramhanand Deshpande","offer_id":46124571787522,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81-Dt_zV-mL._SY466.jpg?v=1746341740"},{"product_id":"bahadur-by-bramhanand-deshpande-बहादूर","title":"Bahadur By Bramhanand Deshpande (बहादूर)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवाघाच्या थोड्या खालच्या अंगाला एक किशोर. पंधरा-सोळा वर्षांचा. हाफ पँट, हाफ शर्ट अशा वेशातला. पायी मोजे. शिकारी बूट. डोक्यावर शहीद भगतसिंगांसारखी कॅप. ओठावर कोवळी मिसरूड. हातातली शॉटगन वाघावर रोखून निडर उभा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडायरीची पानंही भारी कागदाची. काळाच्या ओघात किंचित पिवळी पडलेली. त्यावर काळ्या दळदार अक्षरातलं लिखाण; पण जागोजागी फिकट झालेलं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडायरी बहादर नावाच्या किशोरानं लिहिलेली आहे त्याच्या अनुभवाच्या नोंदी त्यानं केल्या आहेत. प्राध्यापक आनंद यांनी त्या सलग जुळवल्या. काही रटाळ, रुक्ष नोंदी गाळल्या. बहादूरचं प्रथमपुरुषी निवेदन तृतीय पुरुषी केले. त्याच्या सरळधोट भाषेवर डौलदार साज चढवला. डायरीला कादंबरीचं रूप दिलं. डायरीतील स्थळांची वर्णनं वाचून त्यांचा नकाशा तयार केला सरांचे मित्र पंढरीनाथ यांनी.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरानाशी प्रामाणिक असलेले आजम चाचा जीवदयेचे कोणतेही अवडंबर न माजवता बहादूरला सांगतात. “जंगलात कोणताच जीव कणाशी दश्मनी करीत नाही, फक्त भुकेसाठी शिकार करतो, ती ही भुकेपुरतीच. कसलंही कारण नसताना माणसं मारणं ही खराब आदत आम्हा माणसांची.”\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Bramhanand Deshpande","offer_id":46134990143746,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/bahadur-M.jpg?v=1746773862"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/bramhanand-deshpande.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}