{"title":"Aradhana Kulkarni","description":"","products":[{"product_id":"dr-keshavrao-baliram-hedgewar-by-aradhana-kulkarni-डॉ-केशवराव-बळीराम-हेडगेवार","title":"Dr. Keshavrao Baliram Hedgewar By  Aradhana Kulkarni  (डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“आम्ही हिंदू लोक धर्मनिष्ठ आहोत, याचा आम्हांस मोठा अभिमान वाटतो; पण धर्मरक्षण व धर्मपालन यांमध्ये फरक आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्नानसंध्यादी वैयक्तिक धार्मिक आचार यथासांग करणे म्हणजे धर्मरक्षण नव्हे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eज्यांना धर्म जगवावयाचा आहे, त्यांच्यात धर्मावरील हल्ल्यांचा प्रतिकार करण्याची शक्ती असावयास पाहिजे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआमच्या दीन स्थितीला आम्हीच जबाबदार आहोत. हिंदुस्थानात जर धर्मभ्रष्टता पसरली असेल तर त्याला आमची वडील पिढीच जबाबदार आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपरकीयांचे हल्ले त्यांना दिसत नव्हते काय? आक्रमणाची वृत्ती परकीयांत बळावत आहे, याची जाणीव ठेवा. हिंदुस्थानात हिंदू समाज स्वतंत्र राहू शकतो, तो मानाने जगू शकतो, छाती पुढे व मान वर करून चालू शकतो, हा संघाचा विश्वास आहे. यासाठी लागणारी शिस्त, शील आणि संघटन यांचे शिक्षण आज पंचवीस हजारांवर तरुण लोक घेत आहेत. संघाचे लोण खेडोपाडी व प्रांतोप्रांती पोहोचले आहे. समाजाच्या ठिकाणी शक्ती, आत्मविश्वास व स्वाभिमान उत्पन्न झाला तर पंचवीस कोटी संघटित लोकांस स्वत:च्या देशात मानाने जगणे मुळीच अशक्य नाही. हा देश हिंदुस्थान म्हणून ओळखला जातो. हिंदुत्व हा या राष्ट्राचा प्राण आहे; म्हणून या देशाची, धर्माची व संस्कृतीची सर्वतोपरी जबाबदारी हिंदूंना पार पाडता यावी, ही संघाची एकच इच्छा आहे.”\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e– डॉ. केशवराव हेडगेवार,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचांदा शिबिरातील भाषणाचा काही अंश\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडिसेंबर, 1936\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Aradhana Kulkarni","offer_id":46133241872642,"sku":"","price":191.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81SRpTLoZML._SL1500.jpg?v=1746773804"},{"product_id":"premchand-yanchya-nivadak-katha-by-aradhana-kulkarni-प्रेमचंद-यांच्या-निवडक-कथा","title":"Premchand Yanchya Nivadak Katha By Aradhana Kulkarni (प्रेमचंद यांच्या निवडक कथा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराजाराणी, रहस्य व रोमांच यांनी भरलेल्या मनोरंजनाच्या वातावरणातून हिंदी साहित्याला वास्तवाच्या जमिनीवर प्रथम उतरवले ते प्रेमचंद यांनी.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्वातंत्र्यपूर्व काळातील समाजव्यवस्था, जमीनदारी, सरंजामशाही, औद्योगिकीकरण यांचा समाजजीवनावर असलेला प्रभाव व परिणाम यांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात दिसून येते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eते एका साहित्यिक युगाचे प्रवर्तक ठरले. ते सामान्य भारतीयांचे लेखक होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनिम्न व मध्यमवर्गातील सामान्य माणसाला कथाविषय बनवून त्यांनी वास्तव जीवनाचे चित्रण केले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित इ. उपेक्षित वर्गातील माणसे त्यांच्या साहित्याचे नायक होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eग्रामीण समाजातील गंभीर समस्यांचे त्यांनी वास्तव चित्रण केले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभूतकाळाचे गौरवगायन व भविष्यकाळाविषयी अतिरंजित कल्पना या दोन्ही गोष्टींना टाळून त्यांनी वर्तमानकालीन परिस्थितीचे विश्लेषण केले.  प्रेमचंदांच्या मूळ कथा वाचल्या की, त्यांच्या भाषेचं साधेपण लक्षात येतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसाध्यासुध्या माणसांच्या या कथा तेवढ्याच साध्या भाषेत लिहिल्या आहेत. यात मैत्रीमध्ये धोका देणारा ‘मदारी’ जसा आहे तसेच आपल्या विरुद्ध निकाल दिला तरी मैत्री जागवणारे जुम्मन व अलगूही आहेत. एखाद्या स्त्रीवर निरतिशय प्रेम करून तिच्या गर्भातलं दुसऱ्या कोणाचं मूल अत्यंत प्रेमानं आपला समजणारा गंग आहे. तसाच अगदी पहिल्या कथेतला मंदिर, मशीद एकसारखा मानणारा ‘जामिद’ही आहे. ही माणसं वरवर पाहता भोळसट वाटतात; पण त्यांच्यातली आत्यंतिक माणुसकी त्यांना छक्क्यापंजांपासून दूर ठेवते. देवाची पवित्र बाळं असल्यासारखी ही माणसं कथेला वेगळ्या उंचीवर नेतात. सांप्रदायिकता, भ्रष्टाचार, जमीनदारी, कर्जखोरी, गरिबी व वसाहतवाद या विषयांवर प्रेमचंद जीवनभर लिहीत राहिले. आठ दशकांपूर्वी त्यांनी जे लिहिले ते आजही लोकप्रिय आहे. त्यांचे साहित्य आजही समाजजीवनाचा व मानवी प्रवृत्तींचा आरसा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Aradhana Kulkarni","offer_id":46135074193666,"sku":"","price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Premchand-Yanchya-Nivadak-Katha-M.jpg?v=1746860718"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/aradhana-kulkarni.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}