{"title":"Anish Prakashan","description":"","products":[{"product_id":"samruddha-palakatva-by-aditi-kalmekha-समृद्ध-पालकत्व","title":"Samruddha Palakatva By Dr. Aditi Kalmekha (समृद्ध पालकत्व)","description":"\u003cp\u003eया देशात छोटी गाडी चालवताना लायसन लागते. पण पालक होण्यासाठी त्यासाठीचे कौशल्य, समज काहीच सिद्ध करण्याची गरज नसते. पालक होणे हे किती मोठे आव्हान आहे आणि पालकत्वाचे किती विविधांगी पैलू आहेत ? हे सांगणारे हे महत्वाचे पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबाळाच्या वाढीच्या शास्त्रीय महितीपासून मेंदूची वाढ, विविध बुद्धिमत्ता ही सारी शारीरिक मानसिक माहिती देत त्या टप्प्यावर पालकांनी काय करायला हवे ? याचे हे पुस्तक प्रत्येक पालकासाठी जणू गाईडच आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखिकेचे वैशिष्ट्य हे की केवळ तात्विक भाषेत न सांगता विविध परिस्थितीत पालकांनी कसे बोलले, वागले पाहिजे हे उदाहरणासह सांगितल्याने पालकांना नक्की दिशा मिळेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलोकशाही पालकत्व ही संकल्पना मांडत मुलांच्या व्यक्तिमत्वाचा आदर करत त्यांचा आत्मसन्मान न दुखावता त्यांच्याशी संवादाचे कौशल्य कसे विकसित करावे ? हा या पुस्तकातील सर्वात मोलाचा आणि दिशादर्शक भाग सर्वच पालकांसाठी महत्वाचा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपालकत्व या विषयावर खूप बोलले जात असेल तरीही मुलांची वाढ, मानसशास्त्र हा अभ्यास सुलभपणे मांडत त्या स्थितीत कसे बोलावे व कसे हाताळावे हे सोदाहरण मार्गदर्शन झाल्याने हे पुस्तक पालकांसाठी अधिक उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वतः एक डॉक्टर, पालक आणि अनेक पालक- मुलांशी संवाद होत असल्याने डॉ. अदिती यांचे लेखन पुस्तकी न होता अनुभवातून अधिक प्रवाही, सहज व संवादी झाले आहे. त्यामुळे ते समाजाच्या सर्व स्तरातील पालकांसाठी लाभदायक आहे !\u003c\/p\u003e","brand":"Anish Prakashan","offers":[{"title":"Anish Prakashan \/ Aditi Kalmekha \/ Marathi","offer_id":47330429337858,"sku":null,"price":230.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/front2.jpg?v=1770188120"},{"product_id":"jagane-gondun-ghetana-by-dr-aditi-kalmekha-जगणे-गोंदून-घेताना","title":"Jagane Gondun Ghetana By Dr. Aditi Kalmekha (जगणे गोंदून घेताना )","description":"\u003cp\u003eस्वतःचा स्वर घेऊन आलेली अदिती यांची कविता स्व आणि भवतालाला कवेत घेऊन समग्राशी संवाद करणारी कविता आहे. आपल्या जिवंतपणाची खात्री करुन जगण्याच्या वाटचालीतल्या गावांचा ती जसा शोध घेते तशीच आजीच्या लुगड्याच्या गोधडीतला उबदारपणाही जपते. एखादं विरळ होत जाणारं जंगल आणि तसंच घर कवयित्रीला साद घालत रहातं. पोटावरले स्ट्रेचमार्क्स, बुद्ध होण्याची आस, मनाचा आणि बाईपणाचा समंजस शोध त्यातून येणारी व्याकुळता या कवितेतून मातीच्या भिंतीत पावसाळी ओलावा पसरत जावा तशी सर्वदूर पसरत गेलेली आहे. यामुळेच ही कविता एका परिपक्क आणि खोल रुजलेल्या अशा संवेदनशील मनाची कविता वाटते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'माझ्या अस्तित्वाची मुळं दूर दूर पसरत आलीत नदीप्रमाणे' अशा विधानातून कवयित्री केवळ एक भागधेयच मांडत नाही तर स्थलांतराची एक जैव जाणीव देखील मांडते. अतिशय साध्या भाषेत संवादी होत, वेळप्रसंगी एखादी ओवी गुणगुणत कुठलीही कुरकुर न करता आपल्या बाईपणासोबतच भवतालाचा निरंतर शोध घेणारी ही कविता वर्तमानातल्या गंभीर प्रकृतीच्या कवितेला समृद्ध करणारी कविता आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुळात या कवितेचे नाते अबोलपणाशी आहे. पंखात चोच खुपसून बसलेली निर्विकार पाखरे या कवितेत भेटत जातात, तशीच 'कागद आणि पेन असेल तरच लिहिली जाते का कविता?' असे प्रश्न विचारणारी जाणीवही. उपवास करणाऱ्या बाया बाईपणाच्या जगण्याचा अवधा अवकाश मांडून जातात. वेळप्रसंगी परंपरेला सोबत घेऊन निर्भयपणे स्वत्वाचा आणि समूहभावाचा शोध घेणारी अनेकार्थाने जगणे गोंदून घेणारी ही कविता आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअतिशय तीव्र अशा उत्कटतेसोबतच या कवितेच्या परिघातून व्यक्त होणारा सांस्कृतिक अवकाश पारंपरिक स्त्रीवादाच्या कक्षा ओलांडून एकूण मानवी संवेदनेशी नाते सांगणारा, म्हणूनच महत्त्वाचा.\u003c\/p\u003e","brand":"Anish Prakashan","offers":[{"title":"Anish Prakashan \/ Dr. Aditi Kalmekha \/ Marathi","offer_id":47330439495938,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/56_24bd212e-dbe9-4168-ab33-5f02b974a0b1.jpg?v=1770188181"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/anish-prakashan.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}