{"title":"Alistair Maclean","description":"","products":[{"product_id":"bear-island-by-alistair-maclean-अ‍ॅलिस्टर-मॅकलीन-translator-ashok-padhye","title":"Bear Island By Alistair Maclean (बीअर आइसलँड- अ‍ॅलिस्टर मॅकलीन) Translator - Ashok Padhye","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपृथ्वीवरील उत्तर ध्रुव प्रदेशाभोवतालच्या बर्फमय भूमीस आर्क्टिक सर्कल म्हणतात. तिथे हिवाळ्यात दिवसाचे तास कमी व रात्र मोठी असते. अशा ठिकाणी, ’बेअर आयलन्ड’ बेटावर आपले फिल्म युनिट नेऊन चित्रीकरण करण्याचा घाट एका निर्मात्याने घातला. आवश्यक ती सेटिंग्ज सामान-सुमान व माणसे घेऊन एका बोटीने तो तिकडे निघाला. पण वाटेत त्याच्या युनिटमधील काही जण मरण पावू लागले. तर काही जण ’बेअर आयलन्ड’ बेटावर मरण पावले, आणि जन्म झाला एका गूढ नाट्याचा. याचे मूळ दुसऱ्या महायुद्धात होते. अफाट संपत्ती, महायुद्ध व मनुष्यहत्या यांच्यातून एक जबरदस्त हिंसाचार उफाळून आला. संशयाचे काटे सर्वांवर फिरत होते, पण खूनी नक्कीच हुशार व मुरलेला होता. शेवटपर्यंत गूढ वाटणारी ही कादंबरी वाचकांची उत्कंठा कायम राखून ठेवते. एक गुंतागुंतीची विलक्षण कथा, मराठीत प्रथमच!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Alistair Maclean \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":47477078294786,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2067.jpg?v=1773643313"},{"product_id":"fear-is-the-key-by-alistair-maclean-अ‍ॅलिस्टर-मॅकलीन-translator-ashok-padhye","title":"Fear Is The Key By Alistair Maclean (फिअर इज द की - अ‍ॅलिस्टर मॅकलीन) Translator - Ashok Padhye","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रथम ते नाट्य हजारो फूट उंच हवेत सुरू झाले. नंतर हा हवेतला रंगमंच जमिनीवर आला, समुद्रात गेला व अखेर समुद्रतळावर पोचला. त्या समुद्रतळावरील रंगमंचावरती शेवटी रोमहर्षक नाट्याने कळस गाठला. अब्जावधी डॉलर्सची संपत्ती, गुन्हेगार व एक झपाटलेला माणूस. यात घडणारे हे नाट्य आजवर मराठी माणसाने कधी कल्पनेतही आणले नसेल. ‘गन्स ऑफ नॅव्हरॉन्स’चा कादंबरीकार अॅलिस्टर मॅक्लीन याच्या ‘फिअर इज द की’ या जगभर गाजलेल्या कादंबरीचा अनुवाद मराठीत प्रथमच श्री. अशोक पाध्ये यांनी त्यांच्या खिळवून टाकणा-या शैलीत केला आहे. एकदा हे पुस्तक हातात पडले की, वाचून संपेपर्यंत कोणताही वाचक ते दुसNया कोणाला देत नाही. अतिशय उत्कंठावर्धक, थरारक आणि अजोड मानवी बुद्धिकौशल्य दाखविणारी कादंबरी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Alistair Maclean \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":47477116272898,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Fear-Is-The-Key-FC.jpg?v=1773643928"},{"product_id":"hms-ulysses-by-alistair-maclean-अ‍ॅलिस्टर-मॅकलीन-translator-anil-kale","title":"HMS Ulysses By Alistair Maclean (एचएमएसयुलिसिस- अ‍ॅलिस्टर मॅकलीन) Translator - Anil Kale","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eही कहाणी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील आहे. रशियाचे जर्मनीशी युद्ध सुरू असते, आणि एफआर ७७ या मालवाहू आणि तेलवाहू जहाजांच्या ताफ्यामार्फत रशियाला जर्मनीशी लढण्यासाठी अत्यंत निकड असलेले युद्धसाहित्य पोचवण्याची योजना असते. एचएमएस युलिसिस ही ब्रिटिश आरमारातील एक क्रूझर जातीची युद्धनौका या ताफ्याची फ्लॅगशिप असते. तिच्या साथीला आणखी छत्तीRस जहाजे या ताफ्यात असतात. भयंकर थंडी, बर्फवृष्टी, प्रचंड वादळे, चिडलेले व निराश झालेले नौसैनिक, त्यांची झालेली प्रचंड उपासमार, थकवा, झोपेचा अभाव, आणि ताफ्याने रशियापर्यंत पोचता कामा नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारी जर्मन बॉम्बर विमाने, युद्धनौका आणि यू-बोटी, अशा पार्श्वभूमीवरील या ताफ्याच्या– आणि पर्यायाने युलिसिसच्या– प्रवासाची ही कहाणी आहे. या सगळ्या विपरीत परिस्थितीला युलिसिसवरील सगळे अधिकारी आणि नौसैनिक ज्या असीम धैर्याने आणि शौर्याने तोंड देतात त्याचे भेदक वर्णन ‘एचएमएस युलिसिस’ या कादंबरीत आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Alistair Maclean \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":47477130756354,"sku":null,"price":382.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2985.jpg?v=1773644392"},{"product_id":"ice-station-zebra-by-alistair-maclean-आइस-स्टेशन-झेब्रा-अ‍ॅलिस्टर-मॅकलीन-translator-anil-kale","title":"Ice Station Zebra By Alistair Maclean (आइस स्टेशन झेब्रा-अ‍ॅलिस्टर मॅकलीन) Translator - Anil Kale","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eही एक रहस्यकथा\/थरारकथा आहे. आइस स्टेशन झेब्रा या बर्फावर उभारलेल्या तळावर एक मोठी आग लागून तिथे राहून काम करणारे अनेक जण मरण पावले किंवा भयंकर जखमी झाल्याची खबर येते. त्यांना वाचवण्याची कामगिरी अमेरिकन नौदलाची अत्याधुनिक अणुपाणबुडी `यूएसएस डॉल्फिन`वर सोपवली जाते. डॉक्टर कार्पेंटर हा ब्रिटिश गुप्तहेर अनेक खटपटी करून तिच्यावर दाखल होतो. त्याला संशय असतो की आग मुद्दाम लावली गेली आहे. काही संकटांवर मात करून, बर्फाखालून प्रवास करत पाणबुडी आइस स्टेशन झेब्रा शोधून काढून तिथून सर्वांत जवळच्या ठिकाणी पोहोचण्यात यशस्वी होते. ब्रिटनमधले रशियाला फितूर असलेले काही लोक आइस स्टेशन झेब्रावर काम करणार्या लोकांमध्ये सामील होऊन तिथे पोहोचलेले असतात. याचा संशय डॉक्टर कार्पेंटर या ब्रिटिश गुप्तहेराला असल्यामुळे तो आइस स्टेशन झेब्रावर पोहोचलेला असतो. फितुरांमुळे या पाणबुडीवर अनेक जीवघेणी संकटंही येतात. कार्पेंटर या फितुरांना उघडं पाडण्यात यशस्वी होतो का?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Alistair Maclean \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":47477192458498,"sku":null,"price":467.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3905.jpg?v=1773644967"},{"product_id":"puppet-on-chain-by-alistair-maclean-पपेट-ऑन-चेन-अ‍ॅलिस्टर-मॅकलीन-translator-madhav-karve","title":"Puppet On Chain By Alistair Maclean  (पपेट ऑन चेन -अ‍ॅलिस्टर मॅकलीन) Translator - Madhav Karve","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअॅलिस्टर मॅक्लीन यांच्या मर्दुमकी गाजवणार्या अनेक नायकांपैकी ’पपेट ऑन ए चेन’ चा नायक, पॉल शेर्मन. इंटरपोलच्या अंमली द्रव्य विरोधी विभागाचा एक दमदार अधिकारी... पॉलवर हॉलंडमध्ये जाऊन अॅमस्टरडॅममधल्या संशयास्पद अंमली द्रव्यांच्या व्यवहाराचा वेध घेण्याची कामगिरी सोपवली जाते. पॉल अॅमस्टरमध्ये विमानातून उतरताक्षणीच त्याच्या एका सहकार्याची हत्या होते. आणि त्यानंतर संकटांची मालिकाच सुरू होते. अॅमस्टरडॅममधले अंधार्या रात्री पॉलला नकळत काहीकाही सुचवू लागतात. त्याच्या आजूबाजूच्या जगाचे मुखवटे आणि चेहरे उघड होऊ लागतात. अंधारातल्या गूढसावल्या त्याला खुणावत राहतात. अखेरच्या पानापर्यंत खिळवून ठेवणारी खास मॅक्लीन शैलीतली ही कादंबरी वाचकाला सहजपणे एका अद्भूत गूढ वातावरणात घेऊन जाते. पॉलच्या आक्रमक कामगिरीची ही थरारकथा वाचताना रक्त गोठेल, काळजाचा ठोका नक्कीच चुकेल....\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Alistair Maclean \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":47477315207426,"sku":null,"price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/692.jpg?v=1773645554"},{"product_id":"seawitch-by-alistair-maclean-सीविच-अ‍ॅलिस्टर-मॅकलीन-translator-ashok-padhye","title":"Seawitch By Alistair Maclean (सीविच -अ‍ॅलिस्टर मॅकलीन) Translator- Ashok Padhye","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसमुद्र म्हटला की संघर्ष! जीवन-मरणाचा संघर्ष! असा संघर्ष करून त्यातून संपत्ती मिळवणा-यांचा एक वर्ग तयार होतो. मग त्या वर्गात अंतर्गत संघर्षाला वेगळे धुमारे फुटतात. समुद्र म्हटला की साहस! प्राचीन काळापासून माणूस ते करीत आलेला आहे. ...त्या तेलसम्राटाची समुद्रातील तेलविहीर ही त्याच्या साम्राज्याचे केंद्र होते. त्याचा मालक हा कठोर होता. संपत्तीच्या जोरावर काहीही करणारा. त्याची दोनच मर्मस्थळे होती. ती तेलविहीर आणि त्याच्या दोन लाडक्या कन्या. शेवटी त्यांच्यावरच घाला पडला. केवळ सूडापोटी! संघर्ष, साहस, संपत्ती व सूड यांच्या साहाय्याने अॅलिस्टर मॅक्लीनने लिहिलेले हे समुद्रावरचे नाट्य.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Alistair Maclean \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":47477404041474,"sku":null,"price":204.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Seawitch-FC.jpg?v=1773645970"},{"product_id":"south-by-java-head-by-alistair-maclean-साऊथ-बाय-जावा-हेड-अ‍ॅलिस्टर-मॅकलीन-translator-ashok-padhye","title":"South By Java Head By Alistair Maclean (साऊथ बाय जावा हेड-अ‍ॅलिस्टर मॅकलीन) Translator- Ashok Padhye","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदुस-या महायुद्धात पृथ्वीवरील पूर्व गोलार्धात जपानने सागरावरती आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. अशा वेळी एक तेलवाहू बोट धाडसाने प्रवास करीत होती. त्यावर निर्वासित व ब्रिटिश सैन्यातील माणसांनी आश्रय घेतला होता. पुढच्या तीन महिन्यांच्या जपानच्या आक्रमणाची लष्करी गुपिते असलेली कागदपत्रे घेऊन एक हेर पळून जात होता. तर बहुमोल किंमतीचे हिरेही या धामधुमीत हलवले जात होते. शेवटी यातून बॉम्बिंग, जाळपोळ निर्माण होत गेली. त्या थरारक पाठलागात एक दोन वर्षांचे अनाथ पोर सापडले. आठवडाभर पाण्यावरून हालअपेष्टा सहन करीत किनारा गाठला. पण विमाने, पाणबुडी, सैन्य हात धुऊन मागे लागले. या लष्करी धामधुमीत एक मूक प्रेमकथा फुलत होती. मानवी शरीराची व मनाची कमाल क्षमता ताणली जात होती. शेवटी काय झाले?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Alistair Maclean \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":47477510865154,"sku":null,"price":552.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/South-By-Java-Head-FC.jpg?v=1773646343"},{"product_id":"the-dark-crusader-by-alistair-maclean-द-डार्क-क्रुसडेर-अ‍ॅलिस्टर-मॅकलीन-translator-ashok-padhye","title":"The Dark Crusader By Alistair Maclean (द डार्क क्रुसडेर -अ‍ॅलिस्टर मॅकलीन) Translator-Ashok Padhye","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइंग्लंडने एक अभिनव क्षेपणास्त्र तयार करायला घेतले. कारण एका नव्या इंधनाचा शोध लागला होता...... पण त्यांचे शास्त्रज्ञ एकामागोमाग एक गायब होऊ लागले, आपापल्या पत्नींसह!...... कुठेतरी या प्रकल्पाची माहिती झिरपू लागली होती. सारे गुप्तहेरखाते त्रासून गेले...... ती एक मोठी योजना होती. एका शत्रुराष्ट्राची योजना. त्यांना जगावर वर्चस्व हवे होते. ते त्या क्षेपणास्त्रापर्यंत पोहोचू पाहत होते. सर्व काही जमत आले. परंतु क्षेपणास्त्राला फ्यूज घालता येत नव्हता. एक शास्त्रज्ञ त्याचवेळी दूरवरच्या बेटावर पोहोचला. त्याने छडा लावायचा प्रयत्न केला अन् नंतर जो धमाका उडाला तो थरारक भाग वाचताना अंगावर काटे उभे राहतात...... क्षेपणास्त्र, बोटी, हेरगिरी, भावी अणुयुद्धे आणि जगावर सत्ता गाजवण्याची लालसा, एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यावर अॅक्शन व थरारक घटना जन्म घेणारच. या कठोर पाश्र्वभूमीवरती एक नाजूक प्रेमप्रकरण फुलत होते...... अॅलिस्टर मॅक्लीनच्या या कादंबरीचा तेवढाच सरस अनुवाद आपल्यासाठी सादर करीत आहोत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Alistair Maclean \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":47477553889538,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/The-Dark-Crusader-FC.jpg?v=1773646804"},{"product_id":"the-golden-gate-by-alistair-maclean-द-गोल्डन-गेट-अ‍ॅलिस्टर-मॅकलीन-translator-ashok-padhye","title":"The Golden Gate By Alistair Maclean (द गोल्डन गेट -अ‍ॅलिस्टर मॅकलीन) Translator- Ashok Padhye","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजगातील सर्वोच्च महासत्ता म्हणजे अमेरिका देश ! त्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणजे जगातील सर्वोच्च पदावरील व्यक्ती ! अशा व्यक्तिसाठी असलेली सुरक्षा यंत्रणा किती कडक असू शकेल याची तुम्ही कल्पना करू शकता. राष्ट्राध्यक्ष, त्यांच्याबरोबर असलेले तेलसम्राट व अरब राष्ट्रप्रमुख, जागतिक वृत्तसंस्थांच्या वार्ताहरांचा तांडा या सा-यांना एकाने हातोहात ओलीस बनवले. केवळ आपल्या अक्कलहुषारीने ! पोलिस, एफबीआय, सैन्यदल, वायुदल व आरमार हे त्यापुढे हतप्रभ झाले. इतका तो डाव अत्यंत डोके लढवून रचलेला होता. सारे जग श्वास रोधून ते भीषण नाट्य पहात होते. ओलीसांचे प्राण, राष्ट्राची प्रतिष्ठा, सान फ्रान्सिस्को शहराची अर्थव्यवस्था हे सर्व कोंडीत सापडले होते. चोवीस तासात काही केले नाही तर....... तर पुढचा अनर्थ अटळ होता. अशा वेळी वृत्तचित्रे टिपणारा एक छायाचित्रकार स्वत: ओलीस असताना, जवळ कसलेही साधन नसताना याविरुद्ध दंड थोपटतो. ...... पुढे जे काही घडत गेले ते श्री. अशोक पाध्ये यांच्या बहारदार शैलीतल्या अनुवादात वाचा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta","offers":[{"title":"Alistair Maclean \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":47477554938114,"sku":null,"price":212.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/The-Golden-Gate-FC.jpg?v=1773647129"},{"product_id":"the-golden-rendezvous-by-alistair-maclean-अ‍ॅलिस्टर-मॅकलीन-translator-ashok-padhye","title":"The  Golden Rendezvous By Alistair Maclean  (अ‍ॅलिस्टर मॅकलीन) Translator - Ashok Padhye","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eते एक मालवाहू जहाज होते. पण त्यातील काही जागा ही श्रीमंत प्रवाशांसाठी राखून ठेवलेली होती. त्यांच्यासाठी आलिशान केबिन्स, उंची मद्यालय, डान्स हॉल, वायरलेसने शेअर्सची खरेदी-विक्री वगैरे सोयी केल्या होत्या. .... अचानक जहाजावरील कर्मचारी गूढरित्या मरण पावू लागले. त्या रहस्याचा उलगडा होईना. कॅप्टन गोंधळून गेला... पण त्याच्या हाताखालचा एक अधिकारी सावध होता. शेवटी ते जहाज दुस-या एका मालवाहू जहाजाच्या मार्गाला भिडू पाहत होते. त्या जहाजावर खजिना होता... ....एक शास्त्रज्ञ आपणच बनवलेल्या एका अणुबॉम्बसहीत क्षेपणास्त्राला घेऊन पळून गेला... या सर्वांचा एकमेकांशी संबंध येत होता. एक फार मोठा कट राबवला जात होता. फक्त एक अधिकारी तो कट उधळून टाकण्याच्या दिशेने पावले टाकू लागला आणि अचानक... त्या समुद्राच्या पाण्यावर एक नाट्य घडत होते. त्या नाट्यात एक प्रेमप्रकरणही फुलत होते. बोटीवरील जीवनाचे दर्शन घडवणा-या रहस्यमय, उत्कंठावर्धक, कादंबरीचा खिळवून ठेवणारा अनुवाद.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Alistair Maclean \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":47477563130114,"sku":null,"price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/The-Golden-Rendezvous-FC.jpg?v=1773647514"},{"product_id":"the-guns-of-navarone-by-alistair-maclean-द-गन्स-ऑफ-नॅव्हारन-अ‍ॅलिस्टर-मॅकलीन-translator-ashok-padhye","title":"The Guns Of Navarone By Alistair Maclean (द गन्स ऑफ नॅव्हारन- अ‍ॅलिस्टर मॅकलीन) Translator - Ashok Padhye","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदुसऱ्या महायुद्धात ‘खेरोस’ या छोट्या बेटावर १२०० ब्रिटिश सैनिक अडकून पडले होते. हे बेट तुर्कस्तानच्या जवळ होते. त्यांना सोडवायला जाणाऱ्या बोटींना नॅव्हारन बेटावरील महाकाय तोफांचा अडथळा होता. त्या तोफा त्यांच्या समोरच्या समुद्रातील कोणतेही जहाज सहज बुडवू शकत होत्या. नॅव्हारनवर एक भक्कम किल्ला होता. तिथे जर्मन व इटालियन सैन्य होते. अशा या तोफा नष्ट करायला मूठभर माणसांची तुकडी बेटाच्या मागच्या कड्यावरून चढून वर पोचली. खेरोस बेटावरील सैनिकांना सोडविण्यास येणारे ब्रिटिश आरमार, तोफांचे त्यावर धरले जाणारे नेम आणि त्या नष्ट करण्यासाठी पुढे सरकलेली ती मूठभर घातपात्यांची तुकडी यांच्यात शर्यत लागली. शेवटी कोण जिंकले ?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Alistair Maclean \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":47477565587714,"sku":null,"price":382.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1489.jpg?v=1773647820"},{"product_id":"the-last-frontier-by-alistair-maclean-द-लास्ट-फ्रंन्टयर-अलीस्टर-मैकलिन-translator-ashok-padhye","title":"The Last Frontier By Alistair Maclean ( द लास्ट फ्रंन्टयर-अलीस्टर मैकलिन) Translator - Ashok Padhye","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइंग्लंडच्या एका शास्त्रज्ञाला हुकूमशाही राष्ट्रातून सोडवून परत आणायची कामगिरी त्या हेरावर सोपवली जाते. त्यासाठी तो हंगेरीत जातो. तिथल्या सरकारविरोधी संघटनेशी हातमिळवणी करतो; पण काहीतरी बिनसते. सरकारी यंत्रणा सावध होते. आणि सुरू होतो जबरदस्त संघर्ष... सबंध देश तुरुंग बनलेल्या भूमीवरती या संघर्षातही एक अस्फुट प्रेम फुलते. अॅलिस्टर मॅक्लीनची अगदी वेगळ्या पाश्र्वभूमीवरची आगळी थरारकथा!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Alistair Maclean \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":47477583249666,"sku":null,"price":297.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/The-Last-Frontier-FC.jpg?v=1773649350"},{"product_id":"the-satan-bug-by-alistair-maclean-द-सटन-बग-अ‍ॅलिस्टर-मॅकलीन-translator-ashok-padhye","title":"The Satan Bug By Alistair Maclean (द सटन बग - अ‍ॅलिस्टर मॅकलीन) Translator - Ashok Padhye","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eत्या लष्करी संशोधन केन्द्राभोवती ६०० फूट रुंदीचा मोकळा पट्टा. त्यानंतर अत्यंत उच्च दाब असलेल्या पाच विजेच्या तारा. त्यानंतर काटेरी तारांचे दुहेरी कुंपण. बाहेरच्या जगापासून ते संशोधन केन्द्र वेगळे झाले होते. पण इतके असूनही त्या केन्द्राच्या `ई` इमारतीमध्ये असलेल्या एका कुलूपबंद दारापलीकडे एक शास्त्रज्ञ मृत झाला होता. तिथेच एक नवीन लस संशोधित केली होती. ती लस लक्षावधी माणसांचे बळी घेऊ शकत होती. पण ती नवीन संशोधित लस तिथून गायब झाली.... त्या अति गूढ रहस्याचा छडा लागत नव्हता. ते सैतानी विषाणू अखिल मानवजातीचा बळी घेऊ शकत होते. अंगावर काटा आणणारी रहस्यमय कादंबरी श्री. अशोक पाध्ये यांनी आपल्या खास शैलीत मराठीत अनुवादित केली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Alistair Maclean \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":47477584756994,"sku":null,"price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/The-Satan-Bug-FC.jpg?v=1773649745"},{"product_id":"where-eagles-dare-by-alistair-maclean-व्हेअर-ईगल्स-डेर-अ‍ॅलिस्टर-मॅकलीन-translator-madhav-karve","title":"Where Eagles Dare By Alistair Maclean (व्हेअर ईगल्स डेर- अ‍ॅलिस्टर मॅकलीन) Translator- Madhav Karve","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकडाक्याची, गोठवून टाकेल अशी थंडी... अशा थंडीत एका रात्री ब्रिटिश स्पेशल फोर्सेसच्या सात पुरुषांबरोबर एका स्त्रीचा समावेश असलेली टीम जर्मनीतल्या उंच पर्वतराजीच्या प्रदेशात पॅराशूटनं उतरवली जाते... या टीमसमोरचं टार्गेट असतं - ` कॅसल ऑफ द ईगल’ नावाचा, शिरकाव करण्याच्या दृष्टीनं अतिशय दुर्गम, कठीण, अशक्यप्राय आव्हान वाटावं असा एक किल्ला आणि त्यातलं जर्मन सीक्रेट साQव्र्हसचं मुख्यालय... त्यातही या टीमसमोर एक मिशन असतं ते म्हणजे विमान कोसळल्यामुळे नाझींच्या तावडीत सापडलेल्या एका अमेरिकन जनरलची या किल्ल्यातल्या कैदेतून सुटका करणं... त्याची चौकशी करणाऱ्या नाझी अधिकाऱ्यांच्या हातात एक फार महत्त्वपूर्ण अशी गुप्त योजना पडू नये म्हणून... मात्र, ब्रिटिश स्पेशल फोर्सेसचं हे मिशन सुरू झालं नाही तोच या टीमचे सदस्य बळी पडत जातात आणि मिशन गुंतागुंतीचं होत जातं... रहस्यमय, उत्कंठापूर्ण अशा गाजलेल्या चित्रपटाचं उगमस्थान असलेली, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली अॅलिस्टर मॅक्लिनची एक रोमांचकारक साहसकथा...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Alistair Maclean \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":47477592326402,"sku":null,"price":297.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3348.jpg?v=1773650205"},{"product_id":"alistair-maclean-combo-set-14-अ‍ॅलिस्टर-मॅकलीन-कॉम्बो-सेट-१४","title":"Alistair Maclean Combo Set 14 (अ‍ॅलिस्टर मॅकलीन कॉम्बो सेट १४)","description":"\u003cp\u003e1)Bear Island, Price-400rs\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e2)Fear Is The Key, Price-200rs\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e3)HMS Ulysses, Price-450rs\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e4)Ice Station Zebra, Price-550rs\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e5)Puppet On Chain, Price-220rs\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e6)Seawitch, Price-240rs\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e7)South By Java Head, Price-650rs\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e8)The Dark Crusader, Price-280rs\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e9)The Golden Gate, Price-250rs\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e10)The Golden Rendezvous, Price-300rs\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e11)The Guns Of Navarone, Price-450rs\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e12)The Last Frontier, Price-350rs\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e13)The Satan Bug, Price-300rs\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e14)Where Eagles Dare, Price-350rs\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Alistair Maclean \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":47477601370370,"sku":null,"price":4241.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3348.jpg?v=1773650205"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/alistair-maclean.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}