{"title":"Adv. Nisha Dabhade-Chavhan","description":"","products":[{"product_id":"bhidewada-the-legal-battle-by-adv-nisha-dabhade-chavhan-भिडेवाडा-द-लिगल-बॅटल","title":"Bhidewada: The legal Battle By Adv. Nisha Dabhade-Chavhan (भिडेवाडा : द लिगल बॅटल )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। महात्मा जोतीराव फुले लिखित या अखंडानुसार स्त्रीशूद्रातिशूद्र यांच्या जीवनाची अवनती विद्या नसल्यामुळे झाली, कारण विद्या घेण्याची मुभा, स्वातंत्र्य येथील चातुर्वर्ण्य समाजव्यवस्थेत स्त्रीशूद्रातिशूद्रांना नव्हते. ही ज्ञानबंदी तोडण्याचे क्रांतिकारी कार्य महात्मा जोतीराव फुले यांनी केले. १ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठेतील तात्याराव भिडे यांच्या वाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केली. त्याआधी एक क्रांती त्यांनी आपल्या स्वतःच्या घरात केली होती. आपली जोडीदार सावित्रीबाई फुले यांना जोतीरावांनी शिक्षण दिले. कसे शिकवावे याचे प्रशिक्षण घेण्यासाठी अहमदनगर येथील सिंथिया फरार यांच्या शिक्षण-प्रशिक्षण केंद्रात त्यांना पाठवले. प्रशिक्षण पूर्ण करून सावित्रीबाई पुण्यात आल्यावर सनातन्यांचे दगडगोटे, शिव्याशाप झेलत या दांपत्याने ही शाळा सुरू केली. फातिमाबीबी शेख यांचेही साहाय्य त्यात लाभले. तात्याराव भिडे यांनी मुलींच्या पहिल्या शाळेसाठी जागा आणि शंभर रुपयांची देणगी दिली. लहुजी वस्ताद साळवे यांनी सावित्रीबाईंना संरक्षण दिले. महात्मा फुलेंच्या नेतृत्वाखाली सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून सुरू झालेली ही पहिली मुलींची शाळा म्हणजे भारतातल्या स्त्री मुक्तीची पहाट आहे. हा इतिहास डोळ्यांसमोर राहण्यासाठी त्याच्याशी जोडलेल्या जागा, वास्तू जपल्या आणि जोपासल्या पाहिजेत. मानवी इतिहासातील पराक्रम दाखवणाऱ्या त्या खिडक्या असतात. लोकांचा न्यायालयातील लढा आमच्यासारखे चळवळे कार्यकर्ते करतात. असे विषय न्यायालयात अडकले की त्यातून सुटका मिळण्यात बराच काळ जातो. भिडेवाड्यासंदर्भात लढवला गेलेला न्यायालयीन लढा, हा याची साक्ष आहे. त्यात प्रत्यक्ष असणाऱ्या अॅड. निशा दाभाडे चव्हाण यांनी त्याची नोंद या पुस्तकात केली आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"New era Publishing House","offers":[{"title":"New era Publishing House \/ Adv. Nisha Dabhade-Chavhan \/ Marathi","offer_id":46793799762178,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71N6_UyqfHL._SY466.jpg?v=1759301755"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/adv-nisha-dabhade-chavhan.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}